निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र १३ व्या राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज, रविवारी (ता. २९) कोल्हापुरात होत आहे. त्यात ‘सकाळ’चे येथील बातमीदार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. भाजपचे प्रवक्ता, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २९) नष्टे लॉन, महावीर उद्यान जवळ, उद्योग भवनासमोर, कोल्हापूर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आमदार जयश्री जाधव यांचा विशेष सत्कार होणार आहे. राजेंद्र हजारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेत आहेत. आजवर विविधांगी लिखाण केले आहे. निपाणी व परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. आपल्या बातम्यांमधून अनेकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Check Also
यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत
Spread the love राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …