Saturday , May 25 2024
Breaking News

साखरवाडीतील नागरिकांच्यावतीने विविध समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन

Spread the love

निपाणी (वार्ता) : साखरवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने साखरवाडीतील नागरिकांनी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना सोमवारी(ता.३०) दुपारी देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, साखरवाडीतील शौचालय बऱ्याच वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे.त्यामुळे ते
जीर्ण झालेले असून दुरुस्ती करूनही मैला सतत बाहेर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जुनी शौचालय पाडून नवीन शौचालय बांधावे. तसेच खराब शौचालयाची दुरुस्ती व स्वच्छता करावी. साखरवाडी तील अनेक गटारीफुटल्या असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे फुटलेले गटार काढून नवीन गटारी बसवाव्यात. बंद झालेल्या कूप नलिका दुरुस्त करावी. पिण्याचे पाणी नियमित व योग्य वेळी सोडावे.रस्ता रुंदीकरण करावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मिलिंद चौगुले,अरुण आवळेकर, गणेश लोहार, संदिप चावरेकर, प्रमोद कुंभार, उतम लोहार, नजीर नालबंद, सुदाम चव्हाण,हेमंत चौगुले, विकास कदम, वचन सुतार, सुनिल हिरुगडे, चद्रकांत चौगुले, नरेद्र येजरे, किरण तिप्पे, विकास राऊत, गणेश गायकवाड, राहुल पाटील,विशाल सावंत, नामदेव लोहारसुनिल शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तलावाची खोली वाढवण्याची चर्चा, जुन्या तटबंदीचे काय?

Spread the love  निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील जवाहर तलाव मधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *