निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डाॅक्टर, उद्योजक, शिक्षक, समाजीक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लाॅन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली देशमाने यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वैशाली देशमाने या शिक्षिका सध्या गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी येथे गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून गेली ९ वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेत गणित विभागाच्या प्रमुख म्हणून त्या काम पहातात. गणित हा सर्व विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय! पण सोप्या पद्धतीने विषयाचे आकलन करून देण्यात देशमाने मॅडम यांचा हातखंडा आहे. शाळेच्या इतर उपक्रमातही त्या हिरिरीने भाग घेतात. सायन्स आकृत्यांची रांगोळी या त्यांच्या उपक्रमास निपाणीतून त्यांचे खूप कौतुक झाले होते. तत्कालीन नगराध्यक्षा नम्रता कमते यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते.
नुतन महिला आमदार जयश्री जाधव, सिने अभिनेत्री पूजा जयस्वाल, नगरसेवक दिलीप पोवार, अशोक भंडारे, राहूल चव्हाण, शिवराज नाईकवाडे, उदय पाटील ॲड. संदीप पवार, उदय बेलवलकर, पत्रकार संघाचे शिवाजी शिंगे, जावेद देवडी, रतन हुलस्वार, उदय पाटील, बाबुराव वळवडे, अजय शिंगे, रत्नदीप चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …