कोगनोळी : येथे सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्या व्हिजन को-ऑफ सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संचालक अभिजित पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात व्हिजन संस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावीमध्ये चांगले गुण घेऊन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा याठिकाणी सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी साक्षी सूर्याजी पोटले, पृथ्वीराज अजित पाटील, साक्षी भरतेश शिंदे, सिद्धिका जगन्नाथ खोत यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जनरल मॅनेजर अरविंद रसाळ, रणजीत सूर्यवंशी, सुनील गिरगावे, सुनील पुणेकर, अक्षय पाटील, अक्षय लोखंडे, अक्षय अब्दागिरे, श्रीकांत पाटील, सागर पाटील यांच्यासह संचालक, सभासद, ठेवीदार, कर्मचारी उपस्थित होते.
