Monday , September 21 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाचे विद्यार्थी गौरव पारितोषिकासाठी आवाहन

Spread the love

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीदिनी दि. 26 जून 2022 रोजी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या मराठी माध्यम दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेत बेळगाव शहर विभाग आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येकी रोख रुपये 5,000/- व प्रशस्तीपत्र. तसेच सदर विभागांतील प्रत्येक शाळेत सर्वप्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख रुपये 1,000/- व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी सदर विभागांतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनीचे नाव शाळेच्या लेटर हेड्वर सही शिक्क्यानिशी दि. 19 जून 2022 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नेताजी जाधव आणि मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *