सौदलगा : सौदलगा येथील सरकारी मराठी/ कन्नड मुला-मुलींनी शिक्षकांच्या बरोबर जागतिक योग दिनाची जागृती फेरी मोठ्या उत्साहात गावातून काढली. यावेळी 21जून घरोघरी योग, आनंदी जीवन – चांगले जिवन, झाडे लावा – ऑक्सिजन वाढवा, योग करा – आयुष्य वाढवा, आशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी योगाविषयी माहिती दिली. एम. मोकाशी, अनिल शिंदे, स्वाती व्हरकट, अमिता करनूरकर, ज्योती पुजार, बसवराज मळगी, निडगुंजी आणि शाळेतील शिक्षक शिक्षीकांचा सहभाग फेरीत होता ही फेरी झेंडा चौकातून मेनरोड नृसिह मंदीर, चौंडेश्वरी गल्ली मगदूम हाॅस्पीटल ते निळेकर हाॅस्पिटल कासार ते डोंगर गल्ली करुन शाळेत आली. यावेळी गावातील पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
