Saturday , July 13 2024
Breaking News

वेदगंगा नदी काठावरील केबलची चोरी

Spread the love

सौंदलगा : सौंदलगा येथील गुजर मळा, साळुंखे मळा, वेदगंगा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारीसह इतर आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सुमारे ८०० फूट केबलची चोरी झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गुजर मळ्यातील रयत नामदेव साळुंखे, रविवारी रात्री सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी प्रसन्न गुजर यांच्या मळ्यामध्ये जाऊन विद्युत पण चालू करण्याचा प्रयत्न केला. पण पंप चालू होईना त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले. की विहिरी वरील तीनही विद्युत पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यानंतर साळुंखे मळ्यातील आपल्या कूपनलिकेच्या केबल चेक केल्या तर तेथील पण केबल चोरांनी लांबवल्या गेल्या होत्या. जवळजवळ दोन्ही मळ्यातील २०० फूट केबल चोरीला गेल्याचे रविवारी रात्रीच उघडकीस आले होते. त्याच प्रमाणे वेदगंगा नदी काठावरून डोंगर परिसरात असलेल्या माळरानात शेत जमिनीसाठी महादेव पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. यासाठी सदर संख्येने दोन विद्युत पंप बसवले आहेत. हे पंपही चोरीला गेले आहे. जवळ-जवळ लाखोंचे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे यावेळी परिसरात सदानंद कुंभार, मुरारी शिंगाडी, अजित पाटील, अंबादास बावडेकर, विठ्ठल भानसे, सचिन सुतार या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी केबली लांबलेल्या आहेत. हा प्रकार सोमवारी सकाळी लक्षात आला. त्यामुळे सौंदलगा येथील शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी चार ते पाच चोरटे दिवसाढवळ्या साळुंखे मळ्यामध्ये विद्युत पंपाची केबल चोरण्यासाठी आले होते. त्यावेळी सुरेश साळुंखे यांच्या मोटर पेटीवर दगड फेक करून मोटर पेटी फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण शेतात काम करत असलेल्या महिलेमुळे तेथून चोरांनी पळ काढला होता.

About Belgaum Varta

Check Also

अभ्यासातील सातत्य, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली

Spread the love  वृषाली कांबळे; विविध संघटनातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : दहावी, बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *