Saturday , September 21 2024
Breaking News

राज्यात २.५ लाख सरकारी कर्मचारी जागा रिक्त

Spread the love

राजेंद्र वड्डर-पवार : बेरोजगारांना तात्काळ काम द्या
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात अनेक वर्षांपासून सरकारी कार्यलयातील ए,बी,सी आणि डी वर्गातील कर्मचारी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनाकडून निवृत्त झालेल्यांना तात्पुरते जागा भरून सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा करीत आहे. त्यासाठी ताबडतोब सर्व जागा भरून सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना नोकरीत सामील करून घेण्याची मागणी भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वड्डर- पवार यांनी केले आहे. ते गळतगा येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.
राजेंद्र वड्डर म्हणाले, कित्येक वर्षांपासून सरकारी कार्यलयातील कोणतीच पदे भरलेली नाहीत. त्यामुळे सर्वत्र सरकारी कार्यलयात ए,बी,सी,डी ग्रेडचे सुमारे २ लाख ५० हजार ३६३ पदे रिक्त आहेत. यामुळे सरकारी तिजोरीत प्रति महिना सुमारे ८५३१ कोटी रुपये शिल्लक पडत आहे.
सन १९९१ च्या जनगणनेच्या आधारे ७,६३,०६३ इतकी पदे ही सरकारी कार्यलयात नोकरी करत असणाऱ्यांची संख्या आहे. प्रति वर्षी सरकारी कार्यालयातील काम करणारे निवृत्त होत असल्याने रिकामे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सद्य स्थितीत मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिकामे पुढीलप्रमाणे ए ग्रेड मंजूर पदे २७,२०१ असून त्यापैकी १८,३४३ पदेच भरली असून ८,८५८ पदे रिकामी आहेत. बी ग्रेड पदे ५२,०७७ असून त्यापैकी ३२,२१० भरली असून १९,८६७ पदे रिकामी आहेत. सी ग्रेड पदे ५,७४,२८० असून त्यापैकी ४,२३,३९७ पदे भरली असून १,५०,९०३ पदे रिकामी आहेत. तर सी ग्रेडची पदे १,०९,५०५ पदे असून त्यापैकी ३८,७७० पदे भरली असून ७०,७३५ पदे रिकामी आहेत. या पद्धतीने एकूण ७,६३,०६३ पदे भरणे गरजेचे असताना ५,१२,७२० पदे भरली असून तब्बल २,५०,३६३ पदे रिकामी आहेत. यामुळे सद्या असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर जास्त बोजा पडत आहेत.
रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. सरकारी कार्यालयातील पदे न भरल्याने प्रति वर्षी सरकारी तिजोरीवरील बोजा सुमारे ६५३१ कोटी रुपये शिल्लक पडत आहे. आणि ते वाचविण्यासाठी सरकार कडून रिकाम्या जागी तात्पुरते म्हणजे टेंडर काढून एनजीओकडून काम करण्यात येत आहे. शिवाय निवृत्त झालेल्यानाच कमी पगारावर काम देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेकार तरुणांची संख्या वाढत चालली आहे. याकडे सरकारचे मात्र लक्ष नाही. यासाठी सदर रिकामे रिक्त जागा भरावे, अशी मागणी राजेंद्र वड्डर यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *