कोरोनामुळे आंतरराज्य वाहतुकीला मिळाला होता ब्रेक : कर्नाटक महाराष्ट्राकडून चर्चा सुरू
निपाणी : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती. मात्र मध्यंतरी पुन्हा कर्नाटक महाराष्ट्राच्या बस वाहतूक वरून वादंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
शिवाय महाराष्ट्रातील बस स्थानकात बस नेल्या जात नव्हत्या. आता दोन्ही राज्याकडून आगार प्रमुख, अधिकार्यांच्या चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत आंतरराज्य वाहतूक सुरू होण्याची चिन्हे आहेत.
बेळगाव, निपाणी आणि चिकोडी विभागातून कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस महाराष्ट्र राज्यात जात होत्या. कोरोना काळातील आरटीपीसीआर विविध चाचण्या आणि इतर निर्बंधांमुळे राज्यातील बस सेवा बंद होती. त्यामुळे सीमाभागातील नाक्यावर या बस अडवल्या जात होत्या. त्यामुळे आपापल्या आधी पर्यंतच बस सोडल्या जात होत्या. आता कोल्हापूर शहराबाहेरून पुण्या-मुंबईपर्यंत बस सुरू ठेवल्या तरी स्थानकात सोडल्या जात नाहीत. याउलट खासगी प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू आहे.
कर्नाटक राज्यातून कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, इचलकरंजी अशा दहाहून अधिक बस दिवसाला धावतात. पण स्थानकात जात नसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन दोन्ही राज्यातील आगारप्रमुख यांची चर्चा सुरू आहे.
दोन्ही विभागातून पुन्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसात झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
नोकरी, व्यवसायासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक लोक सीमाभागात वास्तव्यास आहेत. शिवाय काही लोक अन्य ठिकाणी वास्तव्यास आहेत. निपाणीमार्गे कर्नाटक राज्यातील गाड्या महाराष्ट्रात ये-जा करीत असल्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, मिरज याठिकाणी जाण्यासाठी दवाखाने व अन्य कामासाठी ये-जा सुरू असते. यामुळे या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे.
Check Also
श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता
Spread the love बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज विजयदशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौडीची …