डॉ. प्रभाकर कोरे : बोरगाव अरिहंत मिलला भेट
निपाणी : केंद्र व राज्य सरकारकडून वस्त्रोद्योग क्षेत्राला उभारी देण्याचे काम होत आहे. सीमाभागातील बोरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग कामगार आहेत. तसेच जवळच मॅचेस्टर नगरी इचरकरंजी ही वस्त्रोद्योगासाठी म्हणून ओळखले जाते.
या परिसरात अरिहंत स्पिनिंग मिलने अत्याधुनिक मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारून राज्यातील वस्त्रोद्योगाला वेगळी दिशा दिली आहे. सहकार क्षेत्राबरोबरच वस्त्रोद्योग क्षेत्रात ही अरिहंत स्पिनिंग मिलने नावलौकिक मिळवल्याचे मत बेळगाव येथील के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील श्री अरिहंत स्पिनिंग मिलला माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मिलचे चेअरमन युवानेते उत्तम पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रभाकर कोरे यांनी स्पिनिंग मिलमधील सर्वच खात्यांची माहिती, अत्याधुनिक बसविण्यात आलेल्या मशनरीची माहिती, कापूस पासून तयार होणारा सुत, आयात-निर्यात, बाजार पेठ, कामगारांची संख्या, कापसापासून उत्पादन होणारे विविध प्रकल्पांविषयी माहिती घेतली. सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी सीमा भागातील बेरोजगारांना व वस्त्रोद्योग कामात कामगारांना राज्यातच नोकरीची संधी मिळावी यासाठी 2016 साली अरिहंत स्पिनिंग मिलची स्थापना केली. वस्त्रोद्योग क्षेत्राला अनेक अडचणी आहेत. पण हे सर्व पार करीत एक नामांकित स्पिनिंग मिल म्हणून हे स्पेनिंग मिल या ठिकाणी चालविण्यात येत आहे. ही बाब कौतुकास्पद असून पुढील काळात वस्त्रोद्योग क्षेत्रात हे स्पेलिंग सर्वांसाठी आदर्श ठरावे, अशी आशा डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी, सध्या बाजारपेठेत मिळत असलेला कापसाला दर, उत्पादन झालेल्या सुताला मिळणारे दर याबाबतची माहिती दिली. यावेळी बैलहोंगलचे विजय मेटगुड, मिलचे मॅनेजर राजेश कारवेकर, टेक्निकल मॅनेजर बी. के. स्वामी, अरिहंत संस्थेचे प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, पि.के.पी.एस.चे मुख्य अधिकारी आर. टी. चौगुले, माजी नगरसेवक अभयकुमार मगदूम, संजय पवार, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …