निपाणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त बुदीहाळ ता निपाणी, जि. बेळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विश्वनाथ पाटील यांना ‘पंडित दीन दयाल अत्योंदय कृषी पुरस्कार’ देशाचे कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत देशातील असामान्य कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार दिला जातो. त्याचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. सुरेश पाटील यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. यापूर्वी त्यांना राज्य स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
यासाठी त्यांना ए.टी.ए.आर.आय Zone.-XI बेंगळुरु, कृषी विज्ञान केंद्र बेळगाव-1 येथील शास्त्रज्ञ श्री. डॉ.आदर्श गौडा, शास्तज्ञ डॉ. दत्ता म्हात्रे, तसेच, बेळगाव आत्मा कृषी अधिकारी एच. डी. कोळेकर, निपाणी कृषी अधिकारी श्री. पुरुषोत्तम पिराजे, श्री. चेतन हत्ती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.