Monday , December 8 2025
Breaking News

सर्वसामान्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर : युवा नेते उत्तम पाटील

Spread the love

बोरगावमध्ये हुसेन ख्वाजा शमना मिरासाहेब प्रवेशद्वाराचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत उद्योग समूहामार्फत गेल्या अनेक दशकापासून बोरगाव शहर परिसराचा सामाजिक विकास करण्यात आला आहे. या विश्वासामुळेच आपणास नगरपंचायत निवडणूक एक हाती सत्ता मिळाली. यापुढे असेच सहकार्य पाटील गटास सर्वांनी द्यावे. आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरच बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास साधणार आहे. शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य च्या सेवेसाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाकडून सुमारे ३ लाख ६५ हजारांवर उपलब्ध निधीतून बांधण्यात आलेल्या या हुसेन ख्वाजा शमना मिरासाहेब मिरजे प्रवेशद्वाराचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बोरगाव सह परिसरात काम करत असताना आपण कोणत्याच प्रकारचे राजकारण केले नाही. त्यामुळेच आज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर आपले सत्ता आहे. तालुक्यातील नागरिकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वासात आपण कधीही तडा जावू दिला नाही. तालुक्यातील नागरिकांना आता बदल हवा आहे. हा बदल लवकरच होणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपण राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे. या ठिकाणी मोहरमच्या वेळी पंजा भेटी व मोहरम उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या ठिकाणी एक सुसज्जीत असे इमारत व्हावी, अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती .या मागणीची दखल घेत सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांनी आपल्या अरिहंत उद्योग समूहाकडून निधी उपलब्ध करून दिला. लवकरच उर्वरित बांधकामही आपण हाती घेणार आहोत. शहरातील नागरिकांना निवडणुकीत दिलेला आश्वासन प्रमाणे सर्वच आश्वासने पूर्णत्व लावून आपला शहर हा एक जिल्ह्यात आदर्श शहर बनवू असा विश्वास शेवटी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
या वेळीनगरसेवक अभयकुमार मगदूम, प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, संगीता शिंगे, सुवर्णा सोभाने, अश्विनी पवार, गिरीजा वठारे, अमर शिंगे, रुकसाना अफराज, दिगंबर कांबळे, पिंटू कांबळे, जावेद मकानदार, राजू मगदूम, दिलीप गोसावी, अशोक नेजे, मारुती निकम, शिवानंद राजमाने, यासीन मिरजे, गोटू खरात, बबलू मीर्जे, लखन गोसावी, शाहिद मुर्जे, बापू गोसावी, आरिफ काझी, मेहबूब राजापुरे, विशाल चीगरे, जितेंद्र कोरवी, विशाल, कोरवी, अमित कोरावी, बाळू शेख, अजय गोसावी, सादिक मोमीन, तोफिक राजापूरे, सलीम मिरजे, काईम मिरजे, रुस्तम मिरजे यांच्यासह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *