निपाणी (वार्ता) : येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री महानवलिया पिराने पीर दस्तगीर साहेब दर्गाह येथे पवित्र मोहरम मासानिमित्त पीर पंजांची स्थापना करण्याचा विधी पार पडला.
यावेळी बेबी फातिमा आणि हसन हुसेन या पीर बाबांचे पंजे आणून दर्गामध्ये चव्हाण वारस यांच्या उपस्थितीत व इम्तियाज गुलाब मुजावर, मलिक रेहान इम्तियाज मुजावर, राजमहमद इम्तिया मुजावर यांनी विशेषप्रार्थना करून चव्हाण वारस संग्राम सिंह बाळासाहेब देसाई सरकार व रणजित सिंह बाळासाहेब देसाई सरकार यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. याठिकाणी इम्तियाज मुजावर याने नवीन कमान तयार करून घेतली.
यावेळी शरदचंद्र मळगे, सदाशिव डवरी, आतिश सुतार, ओमकार येरुडकर, नारायण कोरवी यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यामध्ये पिर बाबांची स्थापना करण्यात आली आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.