निपाणी : खगोल शास्त्र व गणिता वर आधारित असलेल्या ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून एक मुस्लिम धर्मिय सलीमजी मुल्ला हे ज्योतिष शास्त्राच्या आधारे लोकांना मार्गदर्शन करून त्याचा आत्मविश्वास दृढ करतात. कोणती अपेक्षा न ठेवता साध्या सोप्या पद्धतीने समस्या निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. हे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे. म्हणून च श्रीमंतराजमाता जिजाऊ फौंडेशन अर्जुन नगर निपाणी यांनी त्याचा आयोजित केलेला सत्कार योग्य व्यक्तींचा आहे.असे उद् गार वेदशास्त्र पंडित श्री अतुलशास्त्रीजी भगरे गुरूजी यांनी मराठा मंडळ येथे आयोजित केलेल्या आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा शिबिर व श्रावण मास शुभारंभ प्रसंगी बोलताना काढले.
या समारंभास समाधीमठ प्राणलिंगजी स्वामी, नगराध्यक्ष जयंत भाटले, सभापती राजेंद्र गुंदेशा, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉ. अच्युत माने आयुर्वेद कॉलेज प्राचार्य रामाणी, भाजप शहर प्रणव मानवी, श्रीमंत विजयराव देसाई निपाणीकर सरकार इत्यादी उपस्थित होते.