Wednesday , March 4 2026
Breaking News

सौंदलग्याची कन्या सौ. लता संकपाळ यांची कोगील खुर्द ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

Spread the love

सौंदलगा : येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी सौंदलग्यातील रहिवासी संभाजी शिवाजी पाटील यांच्या कन्येच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे माजी सचिव सुभाष कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून, सरपंच पदी निवड झालेल्या सौ. लता संकपाळ यांच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना कोगील खुर्दच्या सरपंच लता संकपाळ म्हणाल्या की, माझे बालपण, शिक्षण सौंदलगा गावामध्ये झाले असून, आज मी सरपंच झाल्यानंतर माझ्या माहेरच्या लोकांनी जो सत्कार केला त्यामुळे मी भारावून गेले आहे. या अगोदर कोगील खुर्द मध्ये माझ्या सासुबाई. सासरे यांनीही त्या गावाचे सरपंच पद भूषविले आहे. त्यानंतर आमच्या सामाजिक कार्याचा विचार करून गावाने मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सरपंच पदाची धुरा सोपवलेली आहे. या सत्कार बद्दल मी सर्वांची आभारी आहे.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विनोद माने, अरुण शिंदे, बी. आर. चौगुले, किरण काळुगडे, जीवक पाटील, ग्राम सदस्या अंजना पाटील, रेखा पोवार, भारती पाटील, विनोद कांबळे, बाळासाहेब चव्हाण, धोंडीराम बावचे, बाळासाहेब शेवाळे, उमाजी माळी, शिवाजी पाटील, राजेंद्र खराडे, के. व्ही. कुंभार यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार दादासाहेब कोगनोळे यांनी मांनले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *