कोगनोळी : येथील उद्योजक महेश पाटील यांचा मुलगा शिवेंद्र पाटील याची देश पातळीवरील शुटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मुंबई येथे शूटिंग स्पर्धेत 340 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात तिसरा तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवेंद्रच्या यशामुळे कोगनोळी गावचा नावलौकिक झाला आहे.
त्याची आता गुजरात अहमदाबाद येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कोल्हापूर येथील परफेक्ट शूटिंग अकॅडमी येथे तो सराव करत असून युवराज चौगुले यांनी त्याला मार्गदर्शन केले आहे. वडील महेश पाटील व चुलते मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील व अन्य लहान मोठ्यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta