राजेंद्र वडर : अनेक कामावर परिणाम
निपाणी (वार्ता) : गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका आणि जिल्हा पंचायत अस्तित्वात नसल्याने जिल्हा पंचायत अधिकार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने निवडणुकीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केली आहे.
वडर म्हणाले, ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदार असे एक प्रकारे कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी वर्गावर नियंत्रण ठेवण्यात येत असते. पण गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत हश दोन्हीही सभागृह, अस्तित्वात नसल्याने नागरिकांना आणि प्रामुख्याने शेतकरी बांधवाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महात्मा गांधी उद्योग खत्री योजनेतून कामे होताना अडचण येत आहेत. शिवाय शाळेत देण्यात येणार्या माध्यान्ह आहारातही अनेक त्रुटी असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचें अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी ताबडतोब निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी वडर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta