सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुकुल विभागांतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन करताना विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या गोवा येथे प्राध्यापक म्हणून कार्य करणारे डॉ. सागर पांडुरंग माळी म्हणाले की, विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट केलेच पाहिजे म्हणजेच आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास कसा करावा अभ्यास करताना वेगवेगळ्या क्लुप्त्या कशा वापराव्यात याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्याला या शाळेने घडविले याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे एस वाडकर हे होते सर्वप्रथम मिनी गुरुकुल विभाग प्रमुख एस व्ही यादव यांनी उपस्थित प्रमुख वक्ते सागर माळी यांचा परिचय करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला सागर माळी यांचे स्वागत श्रीफळ व रुमाल देऊन मुख्याध्यापकांनी केले सागर माळी यांनी आपण हे माध्यमिक शिक्षण कसे कष्टातून घेतले आणि आता एम ए एम एस सी एम बी ए एम टेक अशा विविध पदव्या मिळवल्या याविषयी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितले
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक वाडकर सर यांनी विद्यार्थी कसा घडतो याविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी रंगराव आरेकर यांच्यासह सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस व्ही यादव यांनी केले तर आभार एस डी कुंभार यांनी मानले
Belgaum Varta Belgaum Varta