सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगासह परिसरात शनिवारी गौरीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गौरीच्या प्रतिष्ठापणेची तयारी महिलांनी जोरदार केली होती. गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरवाशींनी आल्या असून, प्रत्येक घरामध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये गौरीची गाणी, झिम्मा फुगडीचा फेर धरला जात आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक ठिकाणी घरोघरी गौरी नेण्यासाठी महिला वर्गाची लगबग दिसून आली. येग येग गौराई, गौरी आली गंगा आली, असे म्हणत महिला गौरी घराकडे घेऊन जात होत्या. तसेच बाल चमू फटाके वाजवत गौरीचे स्वागत करताना दिसत आहेत. गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रविवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta