Thursday , September 19 2024
Breaking News

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

Spread the love
निपाणीत ड्रोन कॅमेऱ्यांची  नजर :पोलिससह पालिकेकडून खबरदारीच्या सूचना
निपाणी(वार्ता): शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.३) दुपारी पोलीस प्रशासनासह नगरपालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, तहसीलदार प्रवीण कारंडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
बसवराज एलीगार यांच्यासह शहर, बसवेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी नगरपालिकेसमोर थांबून प्रमुख मार्गाची पाहणी केली. त्यानंतर जुना मोटर स्टैड, नेहरू चौक, कोठीवाले कॉर्नर, चनन्मा सर्कल, बसस्थानक मुरगूड, चिकोडी रोडसह शहर व उपनगरातून येणाऱ्या गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी एलीगार यांनी शहरात व उपनगरात एकूण असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची माहिती घेऊन विसर्जन व गणेश आगमन काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घ्यावी. शिवाय मंडळांना विसर्जन काळात ठराविक वेळ नेमून द्यावी आणि तत्पूर्वीच विसर्जन करावे, वाहतुकीलाअडथळा ठरेल अशा प्रकारच्या मार्गावर मिरवणुकीला परवानगी देऊ नये. हेस्कॉमला कमीउंचीपर्यंत लोंबकळणाऱ्या विद्युत तारांबाबत सूचित करावे, डिजिटल फलक उभारणीला परवानगी देऊ नये. तसेच ज्या मंडळाकडून डीजे आवाजाचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना करून हा उत्सव शांततेत साजरा करावा असे सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणूक काळात पोलिस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. यामध्ये उपनगर व शहरासाठी दोन स्वतंत्र कॅमेऱ्यांद्वारे विसर्जनमिरवणुकांवर नजर राहणार आहे. त्या अनुषंगाने निपाणी पोलिसांनी सर्व ती तयारी करावी, असे आवाहन केले. यावेळी उपअधीक्षक मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर, बसवेश्वर पोलिस ठाण्याचे आनंद कॅरीकटी, नगराध्यक्ष जयवंत भाटले, हेस्कॉमचे अभियंते अक्षय चौगुले यांच्यासह पोलिस कर्मचारी व नगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *