निपाणी (वार्ता) : येथे बुधवारी (ता.७) होणारा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा हा २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून माजी आमदार काकासाहेब पाटील ह्यांनाच उमेदवार करून ही निवडणूक जिंकण्यासाठी निपाणी येथील प्रमुख कार्यकर्त्याची मते जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, विजय शेटके, दिलीप पठाडे यांच्यासह निपाणी शहरातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
निपाणी येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहाने पार पाडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करण्यासाठी माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी कार्यकर्त्याना अकोला येथील बैठकीत संबोधन केले.
यावेळी रोहन साळवे, बाबा पाटील, धनाजी चव्हाण, प्रशांत बाबासाहेब पाटील, निवृत्ती वारके, जितेंद्र सुर्वे-भारमल, सुरेश नाईक, विलास मुधाळे, हेमंत सुर्वेभारमल, शिवाजी किल्लेदार, बाबासाहेब किल्लेदार, दिलीप मलाबादे, बाबासाहेब कोळी, सचिन कांबळे, संजय बामणे, धनपाल आवटे, आर. टी. सोळांकुरे, भीमराव पुंडे, दिनकर मोहिते, सुनील मलाबादे, इराप्पा जाधव, सुधाकर चव्हाण, महादेव मोहिते, प्रकाश मगदूम, बी. एम. चिंगळे, जितेंद्र पुंडे, मारुती शिंदे, राजेंद्र सुतार (राजापुरे), उत्तम सुतार, नितीन पठाडे, मकरंद पठाडे, विस्वास कुंभार, युवराज पाटील, इंद्रजित सोळांकुरे, समीर मगदूम, रामा बन्ने, महादेव वाडकर, श्रीकांत कोळी, दीपक कोळी, कल्लाप्पा खिलारे, मकरंद पठाडे, गुंडूराव नाईक, संतोष मोहिते, चेतन पाटील, उत्तम सोळांकुरे, सुरेश मोहिते, रत्नदीप पानारी, प्रदीप पाटील, आनंदा वंजारे, बटू कोळी, बाळू घसते, अण्णाप्पा हतगिणे, नागेश कुंभार, अशोक नाईक तसेच ग्राम पंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta