कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग बैठक पार पडली.
बैठकीमध्ये युवा समितीचा विस्तार करण्यासाठी चर्चा झाली.
कार्यकारिणी, पदाधिकारी निवडणे, युवा समितीचा उद्देश बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आला. मराठी भाषेची सध्या निपाणी भागात कशी गळचेपी केली जात आहे. याबद्दल प्रत्येकानी आपली मते मांडली. सीमाभागातील मराठी उमेदवाराना महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी युवा समितीच्या माध्यमातून नेहमी सहकार्य करायचे, असे सर्वानुमते ठरले.
सीमाभागातील मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा आढावा घेण्यात आला. उर्वरित शाळेत साहित्य खरेदी करून वाटप करण्यासाठी चर्चा केली. आर्थिक मदत केलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.
यावेळी युवा समितीचे प्रमुख कार्यकर्ते बंडा पाटील, नवनाथ पाटील, हिंदुराव मोरे, अण्णासाहेब केसरकर, विजय कांबळे (मत्तीवडे), अमोल शेळके (यरनाळ), अमोल पाटील, अजित पाटील, नानासाहेब पाटील (कुर्ली), बंडू किरळे (निपाणी), आदेश पोवार, अमोल निकम (कारदगा), लक्ष्मीकांत पाटील (भिवशी), मलगोंडा घाटगे, संतोष कटवाळे (आडी), नितीन पोवार (सुळगाव), सुरज छत्रे, सुशांत पोवार (मानकापूर) यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta