कोगनोळी : परिसरात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी, मळणीच्या कामाला गती आली असून या कामात शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.
मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा लाभ घेत अनेक शेतकर्यांनी 9305 या जातीच्या सोयाबीन बियांची पेरणी केली होती.
सोयाबीन पिकाच्या कापणी व मळणीचे काम जोमात सुरु आहे. एक एकर सोयाबीन कापणी व मळणीची मजुरी 3 हजार रुपये घेत आहेत. तर मशीन भाडे म्हणून क्विंटलला 300 रुपये भाडे आकारात आहेत. कापणी, मळणीसाठी एक एकर 12 मजुरांना 4 तास लागत आहेत. तर 22 हवा असणार्या सोयाबीनसाठी 45 ते 46 रुपये प्रति किलो असा दर व्यापारी वर्गाकडून दिला जात आहे.
सोयाबीन पिकावरती तांबेरा हा रोग पडल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे. तसेच पावसाचा फटकाही यावर्षी सोयाबीनला बसला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी एकरी 11 ते 12 क्विंटल निघणारे उत्पादन यावर्षी 50 टक्क्यावर आल्याने 5 ते 6 क्विंटल शेतकर्याला नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका शेतकर्याला बसत आहे.
———————-

चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीन उत्पादन कमी निघत आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
– नवनाथ बिद्रोळे शेतकरी दत्तवाडी
Belgaum Varta Belgaum Varta