निपाणी (वार्ता) : बोरगाव इचलकरंजी रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोरगावचा युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. रामा कृष्णा सनदी (वय 32) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रामा हा शहरातील खंडेलवाल औषधी कंपनीत काम करून सायंकाळी घरी येत होता. आपल्या दुचाकी (क्र.के. ए. 23 एक्स 9715) या गाडीवरून वखार जवळ आला असता बोरगाव होऊन इचलकरंजीकडे जाणारा मालवाहतूक टेम्पो (क्र.एम. एच. 09 एफ. एल. 1161) या दोन्ही गाड्यांचे समोर धडक झाली. या जोरदार धडक मध्ये रामाचे मालवाहतुकीच्या हौद्याला जोरदार धडक बसली. यात त्याच्या डोक्यास मार लागून तो रस्त्यावर कोसळला. यामध्ये तो जागीच ठार झाला. घटनेची गांभीर्यता ओळखून मालवाहतूक चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे निदर्शनास आले.
अपघाताची माहिती मिळताच बघ्यांनी या ठिकाणी मोठीगर्दी केली होती. मेंदूचा चेंदामेंदा झाल्याने ओळख पटण्यास विलंब होत होता. त्याच्या दुचाकी गाडी क्रमांकावरून मृत व्यक्ती हा रामाच असल्याचे ओळख पटविण्यात आले. रामा याच्या बहिणीला घटनास्थळी तिच्या माहितीनुसार पोलिसांनी ओळख पटविली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार, पोलीस उपनिरीक्षक एच. भरतगौडा या यांनी आपल्या सहकार्यांसह भेट देऊन पंचनामा केला. दुचाकी व मालवाहतूक गाडी दोन्ही ताब्यात घेतले. रात्री उशिरानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रामा सनदी हा शहरातील खंडेलवाल या कंपनीत काम करीत होते. त्यांचे वडील वारकरी आहेत. गरीब परिस्थितीतून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार्या रामा याच्या मध्ये दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. रामाच्या अपघाती निधनाने त्याच्या मित्र परिवारांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वडील कृष्णा सनदी त्यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपासणी उपनिरीक्षक एच. भरतगौडा करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta