Wednesday , October 16 2024
Breaking News

शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा

Spread the love

राजू पोवार : रयत संघटनेच्या बैठकीत मागणी
निपाणी : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. सर्व शेतकरी रस्त्यावरून जात असताना मंत्री पुत्राने त्यांच्या ताफ्यावर भरधाव वाहन चालवून अमानुष कृत्य केले आहे. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून मंत्री पुत्रावर कारवाई करण्यासह अजय मिश्रा या मंत्रांचा सरकारने राजीनामा घ्यावा, अन्यथा रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा चिक्कोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
लखीमपुर खीरीमधील झालेल्या शेतकरी अन्यायाविरोधात येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी (ता.7) आयोजित रयत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी हिंसाचारात बळी गेलेल्या शेतकर्‍यांना आदरांजली वाहण्यात आली.
राजू पोवार म्हणाले, उत्तर प्रदेशातील सरकारला सत्तेचा माज आला आहे. अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांवरच वारंवार अन्याय होत आहे, ही बाब खेदजनक आहे. याशिवाय हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना लाठ्याकाठ्याने मारा, असे वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले आहेत. शेतकरी विरोधातील कायदे वाढती महागाई याबद्दल बोलण्यापेक्षा शेतकर्‍यांवर अन्याय करण्यातच भाजप सरकार गुंतली आहे. अजूनही शेतकरी संपणे वागत असूनही त्याचा गैरफायदा सरकार घेत आहे. शेतकर्‍यांचा संयम सुटला तर प्रशासनाला आवरणे कठीण होणार आहे. मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशीष मिश्रा त्यांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये. त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. याची दखल घेऊन अशा घटनांना पायबंद घालावे अन्यथा ठिकठिकाणी रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
आय. एन. बेग यांनीही तीव्र शब्दात मंत्री आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. शिवाय भाजप सरकार शेतकरी विरोधात असल्याचे सांगितले.
यावेळी शाळेत संघटनेचे निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, कुणाल सुतळे, मलगोंडा मिरजे, आनंद पोवार, महादेव शेळके, दामू कांबळे, महादेव विटे, गणपती कांबळे, विवेक जनवाडे, बाळासाहेब हादिकर, सदानंद नागराळे, जगदीश मंगावते, महेश जनवाडे, कलगोंडा कोटगे यांच्यासह निपाणी शहर व ग्रामीण भागातील रयत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

Spread the love  आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *