Thursday , September 19 2024
Breaking News

निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

Spread the love

 

प्रसन्नकुमार गुजर : जनता दल पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
निपाणी : कर्नाटक राज्यात निधर्मी जनता दलाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी समाजाला दिशा देणाऱ्या योजना राबविल्या. त्यांच्या दूरदृष्टी योजनामुळे राज्यातील विकास अद्यापही गतिमान असून अनेक योजना विकासाच्या दृष्टीने कायम राखले आहेत. राज्याला कुमारस्वामी सारखे नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे कुमारस्वामी यांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य पर्यंत पोचली पाहिजे. त्यांचे कार्य सर्वसामान्यांना समजले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्यांच्यातूनच कुमारस्वामी यांचे नेतृत्व पुन्हा राज्यात येण्यासाठी निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निपाणी ब्लॉक निधर्मी जनता दलाचे अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर यांनी केले.
निपाणी शहर मायनॉरिटी निधर्मी जनता दल पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात तेे बोलत होते.
कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून निधर्मी जनता दल बेळगाव जिल्हा अध्यक्ष फैजुल माडीवाले, कर्नाटक स्टेट सेक्रेटरी पठाण चाचा, कर्नाटक स्टेट जनरल सेक्रेटरी सुनीता होणकांबळे (लाटकर), निपाणी भाग मायनॉरिटी अध्यक्ष समीर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रसन्नकुमार गुजर म्हणाले, निपाणी भागातही निधर्मी जनता दलाची भरपूर कामे झाले आहेत पक्षानेही नेहमी निपाणी मतदारसंघाकडे लक्ष दिले आहे मात्र पक्षाने केलेल्या विकासाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि विकास कामाची माहिती घरोघरी पोहोच करणे गरजेचे आहे यामुळे पक्षाच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना होऊन पक्ष वाढीला चालना मिळेल.
निधर्मी जनता दल  बेळगाव जिल्हा अध्यक्ष फैजुल माडीवाले, बेळगाव जिल्ह्यात कुमारस्वामी यांच्या काळातील सरकारने विकासाची गंगा आणली होती. सर्वसामान्यांना अनेक योजना दिल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्यांना नेहमीच कुमारस्वामी सरकाराची आठवण राहिली आहे. कुमारस्वामी यांच्याबद्दल बेळगाव जिल्ह्यात मोठा चहता वर्ग आहे. कुमारस्वामींच्या कार्याबद्दल लोकांना आकर्षन असून पुन्हा राज्यात त्यांची सत्ता यावी अशी आशा असून हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी अगदी वेगाने कामाला लागणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले

कार्यक्रमास निपाणी शहर अध्यक्ष सैफुल पटेल, वर्किंग प्रेसिडेंट सुबहान नायकवडे, व्हाईस प्रेसिडेंट अब्दुल मकानदार, जनरल सेक्रेटरी फरकान कुन्नुरे, जॉइंट सेक्रेटरी टिपू सुलतान ननदि, मुजाहिद शेख, हनीफ आत्तार, टिपू सुलतान पकाली, जुबेर मनेर, सलमान वडगावकर, अरिफ आटोडे, सिद्दीक बागवान, कयूम नाईकवाडे, यांच्यासह निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *