खासदार अण्णासाहेब जोल्ले : नगरपालिकेत गांधी जयंती
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बऱ्याच वर्षानंतर आता शहरात महात्मा गांधी पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात पुतळा बसवला आहे. त्याची नगरपालिका कडून चांगली देखभाल होणार आहे. यापुढे काळातही तरुण आणि विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे, असे मत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील नगरपालिकेतील दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे सभागृहात आयोजित गांधी जयंती प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी स्वागत केले. त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले व अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजीव गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, नगरसेविका आशा टवळे, सुजाता कदम, उपासना गारवे, अरुणा मुदकुडे, रंजना इंगवले, रवी इंगवले, प्रणव मानवी, रवींद्र कदम, मारुती विषय, अमित रणदिवे दिलीप पठाडे, शौकत मनेर, दत्ता नाईक, उदय शिंदे, संजय चिकोडे, गणू गोसावी, दीपक माने, पिंटू बागडे, मारुती भिसे, अण्णासाहेब कुराडे, सुनील राऊत यांच्यासह नगरसेवक, पालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta