कर्तव्यदक्ष महिला : दिवाळीत कुटुंबापासून अलिप्तच
निपाणी (वार्ता) : सण समारंभापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे समजून अनेक जण काम करीत आहेत. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर या गेल्या तीन दिवसापासून निपाणी येथील आपले हेड कॉटर्स सोडून कित्तूर येथे कर्तव्य बजावत आहेत. ऐन दिवाळीत कुटुंबाला बाजूला ठेवून त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कार्याचे निपाणी शहर व परिसरातून कौतुक होत आहे.
दिवाळी सणामध्ये कामावर असलेल्या अनेक महिलांना सुट्टी त्यामुळे त्या काळात महिला आपले कुटुंब नातेवाईकांच्या बरोबरच हा सण साजरा करतात. पण येथील शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका गुर्लहोसूर या त्याला अपवाद ठरला आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून निपाणी शहरात त्या कार्यरत आहेत. शहरातील मोर्चा, निवेदनासह अनेक घटना घडामोडीवर लक्ष ठेवून त्यांनी आपले काम चोखपणे बजावले आहे. कुटुंबापेक्षा कर्तव्य महत्वाचे समजून त्यांनी अनेक गुन्ह्यांच्या घटनांचा तपास केला आहे. त्यामुळे महिला वर्गात त्यांची मोहोर उमटली आहे. सध्या दिवाळी सण असतानाही कितुर उत्सवाच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसापासून निपाणी शहर सोडून कित्तूर मध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. सध्या या शहरात त्यांनी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार बंदोबस्तात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर महिला व युतीनी घेण्यासारखी आहे.
त्यापूर्वी त्यांनी निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातही काम केले आहे. या काळात गुन्हेगारीला आळा घालण्यासह अनेक महत्त्वाची प्रकरणे त्यांनी उघडकीसआणली आहेत. मात्र सध्या दिवाळी असताना सुद्धा त्यांनी कुटुंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणून केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
———————————
‘दिवाळी सणामध्ये कुटुंबात महिला उपस्थित असणे आवश्यक आहे. या काळात नातलग आप्तेष्ट व मुलांच्या समवेत वेळ घालवला जातो. पण कर्तव्यापो आपण सेवा बजावत आहोत. त्यासाठी प्रत्येकाने कुटुंबापेक्षा समाजाची सेवा महत्त्वाची मानून काम करणे आवश्यक आहे.’
-कृष्णवेणी गुर्लहोसुर, उपनिरीक्षिका, शहर पोलीस ठाणे निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta