सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील शेतकरी नामदेव साळुंखे यांना घोणस आळीने दंश केल्याने अस्वस्थ झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रनंतर आता सीमाभागामध्ये या महाभयंकर घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी कुर्ली व मत्तीवडे येथे उसाच्या पानावर घोणस अळी आढळून आल्या होत्या. त्यानंतर दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सौंदलगा येथे तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये गवतावर ही घोणस आळी आढळून आली. त्यानंतर आता येथील शेतकरी नामदेव साळुंखे हे आपल्या निपाणी येथील शेतमालकास दिवाळीच्या पूजेसाठी ऊस आणण्यासाठी गेले असता ऊस काढतेवेळी ऊसावरील घोणस आळीने दश केल्यामुळे त्यांना उलट्या व वेदना होऊ लागल्या वेदना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे सौंदलगा येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार करून घेतले. सौंदलगा येथे घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta