विजय देवणे परत महाराष्ट्रात : शिवसैनिकांना कर्नाटक प्रवेश बंदी
कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योउत्सव तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोकांचा काळा दिन म्हणून साजरा करतात. जिल्ह्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कर्नाटकात जाण्यासाठी येतात. पण कर्नाटक प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवर पोलिसांच्या तर्फे अडवणूक करून त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून दिले जात आहे.
सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरहून बेळगाव कडे जाणाऱ्या शिवसेनेच्या मशाल व भगवा झेंडा मोर्चाला दूधगंगा नदीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवणूक करून कर्नाटकात जाण्यास बंदी केली. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाची गुंडगिरी लक्षात घेऊन मशाल व झेंडा घेऊन राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे सुमारे दोन तास राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश करणारच या उद्देशाने आलेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी प्रवेश बंदी केल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दूधगंगा नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. पोलिसांनी कर्नाटक प्रवेश बंदी केल्याने शिवसैनिक घोषणाबाजी करत परत गेले.
मंगळवार दिनांक एक रोजी सकाळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय देवणे बेळगाव ला जाण्यासाठी दूधगंगा नदीवर आले असता. दुसऱ्या दिवशीही कर्नाटक पोलिसांच्या कडून त्यांची अडवणूक करण्यात आली. यावेळी विजय देवणे यांनी आपण कोणत्याही प्रकारचा मोर्चा न घेऊन जाता बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी चाललो आहे. तरी आपल्याला सोडण्यात यावे अशी विनंती केली. पण येथील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी कर्नाटक प्रवेश बंदी असल्याने सोडण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगितले.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटक शासनाकडून मराठी भाषिक लोकांची अडवणूक करणे दादागिरी चे काम होत आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी जात असताना शासनाने दिलेली वागणूक ही निंदनीय आहे. यासाठी पोलीस प्रशासन व शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी डीवायएसपी व्ही टी दोड्डमणी, मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार, महादेव एस एम, तवराप्पा एस एल, उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह अन्य पोलीस फौज
Belgaum Varta Belgaum Varta