निपाणी : बोरगाववाडी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मंगळवारी (ता.12) सायं. 7 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय माने यांनी दिली.
नवरात्र उत्सवानिमित्त श्री नवदुर्गा कला कला-किडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दिवंगत मोहनराव माने शेती माळावर या कीर्तनाचे आयोजन केले आहे. भागातील वारकरी सांप्रदायाबरोबर युवा पिढीलाही मोलाचे मार्गदर्शन व्हावे व समाज वाईट रूढी परंपरेतून बाहेर पडून चांगल्या मार्गावर वावरावा, या उद्देशाने शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही अध्यक्ष विजय माने यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याची विनंती केली आहे. कीर्तनासाठी परिसरासह गावातील माळकरी, टाळकरी व भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे. बैठकीत उपाध्यक्ष जितेंद्र टाकमारे, सागर खोत, अमोल पाटील, सागर शिरगावे, संजय टाकमारे, देवगोंडा कळंत्रे, राकेश टाकमारे, बजरंग टाकमारे, दादासो टाकमारे, संदेश कमते, शिवा खोत, सी. एल. खोत, रामगोंडा पाटील, भैय्या माने, प्रतीक टाकमारे, संतोष खोत, बंडा शिरोळे, नायकु खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …