सौंदलगा : सौंदलगा ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेबद्दल सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्जाचे निवेदन देण्यात आले आले आहे. सौंदलगाव ग्रामपंचायतीमार्फत एन. आर. जी. फंडातून या कचरा प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर होऊन मंजुरीही मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये प्रकल्पाची लांबी रुंदी साठ फूट बाय 40 फूट तसेच उंची 18 फूट ठरलेली आहे. मात्र प्रकल्पाची उंची चार फुटाणे कमी केली आहे तसेच या प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. आहे याबाबत संबंधित ग्राम पंचायत पी. डी. ओ. यांना सांगूनही त्यांनी कामाची दखल घेतलेली नाही त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्याकडून याबाबत तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta