निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत दिवंगत माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील चौगुले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील गटाचे समर्थक वृषभ सुनील चौगुले यांचा ९७ मतांनी विजय झालात्याबद्दल युवा नेते उत्तम पाटील फाउंडेशनतर्फे उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उत्तम पाटील यांनी, गटातटाचे राजकारण करता गावच्या विकासासाठी सर्वच सदस्यांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास हालशुगरचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, सुरज किल्लेदार, अमर स्वामी, प्रमोद पाटील, पिंटू जमादार, दादा साहेब किल्लेदार, दत्ता किल्लेदार, महादेव मुरदंडे, राजू अंबी, बजरंग कापसे, अण्णापा गोरडे, शंकर कांबळे, बजरंग शिंगे, बाळू बरगाले,माणिक पाटील, विठ्ठल सुतळे, दाऊद मुल्ला, आप्पासो अडदांडे, राजू जमादार, फिरोझ मुल्ला, कपिल मोरे, अभिजित हेब्बाळे, अभिजित चौगुले, ममदापूरचे निरंजन पाटील (सरकार ), चेतन स्वामी, बाबासो अस्वले, पोपट सिदनाळे, इंद्रजित सोळांकुरे, चंदू मुधाळे, सुहास पठाडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष संपत स्वामी,हेमंत भारमल, सुरेश मोहिते, सचिन गुरव, अनिल पाटील, आतिश मलाबादे, यश कागे, रितेश पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta