Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

छत्तीसगड मधील नन्सच्या अटकेचा बिशप यांच्याकडून निषेध

  बेळगाव : छत्तीसगड पोलिसांनी दोन कॅथोलिक नन्सना अटक केल्याच्या घटनेचा बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी तीव्र निषेध केला आहे. अटक करण्यात आलेल्या नन्स व युवकासाठी प्रार्थना करण्याचे आणि या अटकेविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. केरळ येथील दोन कॅथोलिक नन – सिस्टर प्रीती मेरी व सिस्टर वंदना …

Read More »

इस्कॉन जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन कामांची जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून पाहणी

  बेळगाव : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, मुडलगी गोकाक, रामदुर्ग आणि रायबाग तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या जलजीवन मिशन कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. राहुल शिंदे यांनी सौंदत्ती तालुक्यातील तडलसुर ग्रामपंचायत हद्दीतील हलकी गावाला भेट देऊन जलजीवन मिशन योजना प्रकल्पाचे कामकाज अहवालानुसार झाले आहे …

Read More »

रस्ते सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश…..

  बेळगांव: अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी रस्ते सुरक्षिततेचे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली जावी यासाठी सुरक्षा आधारित कृती आराखडा राबवला पाहिजे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (जुलै ३०) झालेल्या जिल्हास्तरीय रस्ते …

Read More »

….म्हणे शुभम शेळके यांना हद्दपार करा; “करवे”ची पोलिस आयुक्तांकडे मागणी

  बेळगाव : मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी न्यायालयील लढ्यासोबत कायद्याच्या चौकटीत राहून रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या समिती नेत्यांवर करवेच्या गुंडांची नेहमीच वक्रदृष्टी असते याचेच प्रत्यंतर आज पुन्हा बेळगावकरांना आले आहे. सीमाभागात भाषिक तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करणारे युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करून बेळगाव …

Read More »

हेस्कॉम अधिकाऱ्यांना कंग्राळी ग्रामस्थांचे निवेदन!

  बेळगाव : कंग्राळी खुर्द या गावचे ग्रामी पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने लोंबकणाऱ्या तारा व जुने खांब बदलून नवीन खांब बसवावे अश्या आशयाचे निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. या गावात बऱ्याच ठिकाणाचे विद्युत खांब जुणे असलेने ते जीर्ण होऊन खराब झाले आहेत. तसेच गावात …

Read More »

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  बेळगाव : बेळगावच्या विनायकनगरमध्ये राहणारी अपेक्षा किशन राठोड ही 4 वर्षांची चिमुरडी गंभीर हृदयविकाराने त्रस्त आहे. तिच्या हृदयाच्या झडपाला छिद्र असल्याचे निदान झाले असून, डॉक्टरांनी तातडीने “Redo MVR” (ओपन हार्ट सर्जरी) करण्याचा सल्ला दिला आहे. अपेक्षा जन्मल्यापासूनच वारंवार आजारी पडत होती. यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली आहे, पण प्रकृतीत सुधारणा …

Read More »

बेळगाव ग्रामीणमध्ये प्रथमच कावड यात्रा

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण परिसरातील बेनकनहळ्ळी गावातील काही हिंदू युवकांनी एकत्र येऊन प्रथमच कावड यात्रेचे आयोजन केले. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच पवित्र नद्यांचे जल एकत्र करून खानापूर येथील मलप्रभा नदीचे जल घेऊन, पारंपरिक पद्धतीने गंगा पूजन आणि आरती करून कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही कावड यात्रा खानापूर-बेळगाव …

Read More »

शहापूर मंगाई देवी ट्रस्टतर्फे आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि मराठा पंच मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी वेद पठण, देवीला अभिषे,कुंकुम पूजा व महापूजा होणार आहे. उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून दुर्गा सप्तशती, …

Read More »

वाढदिवस विशेष : आबासाहेब नारायणराव दळवी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व!

आबासाहेब नारायणराव दळवी एक प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व! ज्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या कुटुंबीयांसह समाजाला आदर्शवत आहे. पेशाने शिक्षक असणारे आबासाहेब हे एक आदर्श शिक्षक तर आहेतच पण ते एक आदर्श व्यक्ती आहेत. फक्त नोकरी करणे हे त्यांच्या मनाला कधी पटलेच नाही. नोकरीसोबतच समाजाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नोकरीसोबतच कला, क्रीडा …

Read More »