Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन कामांची जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून पाहणी

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, मुडलगी गोकाक, रामदुर्ग आणि रायबाग तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या जलजीवन मिशन कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. राहुल शिंदे यांनी सौंदत्ती तालुक्यातील तडलसुर ग्रामपंचायत हद्दीतील हलकी गावाला भेट देऊन जलजीवन मिशन योजना प्रकल्पाचे कामकाज अहवालानुसार झाले आहे की नाही याची माहिती घेत ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांची चर्चा केली. त्याचप्रमाणे सौंदत्ती तालुक्यातील सोप्पडला ग्रामपंचायत क्षेत्रातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची तपासणी केली. तसेच रामदुर्ग तालुक्यातील गुडूगप्पा, हिरेकोप्पा के.एस.तसेच के. चंदरगी ग्रामपंचायत क्षेत्रातील चिकोप्पा के. एस. बागोजिकोप्प व हुलकुंद आदी ग्रामपंचायतीना सीईओ राहुल शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जलजीवन मिशन योजनेच्या कामाची पाहणी केली व गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रांच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले. पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत उर्वरित गावांची कामे तात्काळ पूर्ण करावीत व नागरिकांना न जोडणी द्वारे पाणीपुरवठा सुरळीत करावा असे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्याचप्रमाणे जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी तालुक्यातील धर्मट्टी,मुसुगुप्पि ग्रामपंचायत त्याचप्रमाणे रायबाग तालुक्यातील बेनडवळ व निपनाळ ग्रामपंचायत हद्दीतील जोडाट्टटी ग्रामपंचायत क्षेत्रातील जे.जे. एम.कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.त्याचप्रमाणे सी ओ राहुल शिंदे यांनी गोकाक तालुक्यातील कळीगुड्डी, कौजलगी, गोसबाळ, बिलकुंदी व तळकटनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांना भेटी दिल्या व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरांना दिलेल्या नळ जोडणी बाबत स्थानिक लाभार्थ्यांची चर्चा केली व पाणीपुरवठा व्यवस्थित होत आहे की नाही याची माहिती घेतली. यावेळी बेळगाव विभाग ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आनंद बडकुंद्री, बसवराज ऐनापुर, एफ.जी. चिन्ननवर, सुरेश कद्दू, तालुका ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता, तालुका पंचायत राज व ग्रा.सहाय्यक संचालक तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *