Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू

  नवी दिल्ली : डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते. आम्ही या प्रकरणी अधिक माहितीची वाट पाहत आहोत,” असे उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. त्यांनी …

Read More »

सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या हितासंदर्भात चर्चा!

  बेळगाव : आज शनिवार दि. १४ रोजी बेळगाव मिडिया असोसिएशनची बैठक श्री शंभू जत्तीमठ येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या सदस्या अरुणा गोजे- पाटील यांचे सासरे प्रभाकर नारायण गोजे -पाटील त्याचबरोबर अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्वांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळा क्र. 5 च्यावतीने जनजागृती फेरी

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पर्यावरणाचे महत्व आणि मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासंदर्भात चव्हाट गल्लीत जागृती फेरी काढण्यात आली शाळेच्या आवारात जागृती फेरीचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

अथणीहून दावणगेरेला निघालेल्या बस आणि कारचा भीषण अपघात: दोघांचा जागीच मृत्यू

  अथणी : बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर तालुक्यातील कुमारपट्टणम गावाच्या बायपासजवळ ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख प्रवीण (३६) आणि विजय अशी झाली आहे, जो मूळचा दावणगेरे येथील आहे. या घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बस अथणीहून दावणगेरेला जात होती. …

Read More »

संतापलेल्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या!

  बेळगाव : कामावर जाण्याचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाची गुप्तपणे हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उघडकीस आणले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. आज बेळगाव …

Read More »

पाळीव कुत्र्यानेच घेतला मालकाचा चावा..!

  बेळगाव : स्वतःच्याच पाळीव कुत्र्याने मालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे. कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सुभेदार पुंडलिक गौंडवाडकर गेल्या अनेक वर्षांपासून घरात रॉटवायलर जातीचे कुत्रे पाळत होते. ते त्याला लहान मुलासारखेच सांभाळत होते आणि कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांनी त्याला वाढवले होते. नेहमी …

Read More »

सुळगा (हिंडलगा) येथे शेडमध्ये गवंडी कामगाराचा गळा आवळून खून

  बेळगाव : सुळगा (हिंडलगा) येथील एका शेडमध्ये एका गवंडी कामगाराचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.।खानापूर तालुक्यातील गस्टोळी दड्डी (ता. खानापूर) येथील हा गवंडी कामगार असून शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कुबेर देमाण्णा दळवाई (वय 36 वर्ष) राहणार गस्टोळी दड्डी असे खून झालेल्या व्यक्तीचे …

Read More »

शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

  बेळगाव : महाराष्ट्र्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी भागातील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी मार्गदर्शन केले. राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, रणजित हावळानाचे, अभिजीत मजुकर, परशराम शिंदोळकर, दीपक गौंडाडकर, मनोहर शहापूरकर, महेश पाटील, रोहित वायचळ, शिवाजी उचगावकर, नितीन …

Read More »

समाजसेवक सुधीर नेसरीकर यांनी वृद्ध महिलेला मदत करून दाखवली सामाजिक जाणीव

  संजीविनी वृद्धांना आधारची मदत बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि संजीवीनी फौंडेशनचे हितचिंतक सुधीर नेसरीकर हे सकाळी फिरायला गेले असता आदर्शनगर येथे त्यांना एक वृद्ध महिला एका ठिकाणी बसलेली दिसली त्यांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण ती आपले नाव आत्तापत्ता सांगण्याच्या परिस्थितीत न्हवती. ती मनोरुग्ण असल्याचे समजताच लागलीच त्यांनी …

Read More »

आंब्याच्या स्थीर किंमतीसाठी सिध्दरामय्यांनी मागितली केंद्राची मदत

  बंगळूर : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ‘गंभीर संकटा’मुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना हस्तक्षेप करून आंब्याच्या किंमती स्थिर करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. “मे ते जुलै या हंगामात, मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक झाल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात,” असे सिद्धरामय्या यांनी चौहान यांना लिहिलेल्या …

Read More »