संजीविनी वृद्धांना आधारची मदत
बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि संजीवीनी फौंडेशनचे हितचिंतक सुधीर नेसरीकर हे सकाळी फिरायला गेले असता आदर्शनगर येथे त्यांना एक वृद्ध महिला एका ठिकाणी बसलेली दिसली त्यांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण ती आपले नाव आत्तापत्ता सांगण्याच्या परिस्थितीत न्हवती. ती मनोरुग्ण असल्याचे समजताच लागलीच त्यांनी संजीवीनी फौंडेशनच्या मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना संजीवीनी फौंडेशनमध्ये घेऊन आले व तिला न्याहरी देऊ केली. यावेळी प्रदीप चव्हाण देखील उपस्थित होते.
थोड्या वेळाने त्यांचे नातेवाईक आदर्शनगर येथे तिला शोधत असताना संजीवीनी काळजी केंद्रात विचारपूस करण्यासाठी आले आणि त्यांची गाठभेट झाली.
अशा तऱ्हेने त्या आज्जीला नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
नातेवाईकानी संजीवनी फौंडेशन आणि सुधीर नेसरीकर यांचे आभार मानले.