Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

चव्हाट गल्ली परिसरात 11 वर्षीय बालकावर बेवारस कुत्र्यांचा चावा

  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. चव्हाट गल्ली परिसरात 4 ते 5 कुत्र्यांनी शिवराज जयानंद शंकपुरे वय वर्ष 11 राहणार चव्हाट गल्ली याच्यावर हल्ला करून चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेकडे तसेच संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाकडे वारंवार मागणी करून देखील …

Read More »

बेळगाव विभागीय कृषी सवलती वितरण समारंभ

  बेळगाव : वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे म्हादई प्रकल्पास विलंब होत आहे. म्हादई , मेकेदाटू, कृष्णा उच्‍च भाग प्रकल्पांतर्गत आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यासह राज्यातील अर्धवट असलेले सर्व सिंचन प्रकल्प तात्काळ सुरू करण्यास राज्य सरकार तयार आहे. केंद्र शासनाने संघराज्य प्रणालीमध्ये मध्यस्थी करत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस अनुकूलता निर्माण करावी, अशी …

Read More »

निवृत्त राज्य पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या

पत्नीकडूनच हत्या झाल्याचा संशय बंगळूर : निवृत्त पोलिस महासंचालक (डीजी आयजीपी) ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना बंगळुरमधील एचएसआर लेआउटमधील एका घरात घडली. कर्नाटक केडरचे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांनी राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून काम केल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती घेतली. …

Read More »

कलामंदिर आणि व्यापारी संकुलामधून मिळणारे उत्पन्न बेळगाव शहराच्या विकासासाठी वापरा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आवाहन

  टिळकवाडी येथील कलामंदिराचा उद्घाटन सोहळा बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी (20 एप्रिल) केंद्र आणि राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 47.83 रुपये खर्चून टिळकवाडी येथे 2.62 एकर जागेवर बांधलेल्या आधुनिक सुविधांनी युक्त बहुमजली (कलामंदिर) इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बहुउद्देशीय कलादालन आणि …

Read More »

पक्ष्यांसाठी धान्य, पाणी ठेवा उपक्रम : जायंट्स मेनतर्फे मातीची भांडी वाटप

  बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे तहानेने व्याकुळ होत आहेत त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर परसबागेत बाल्कनीमध्ये पाणी आणि धान्य ठेवावे असे आवाहन जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले. बॉक्साइट रोड वरील ग्रीन गार्डनमध्ये जनजागृती कार्यक्रम …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

    बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून संस्थेस ग्रंथ खरेदी या उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई या संस्थेतर्फे “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास अर्थसाहाय्य” या योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानातून विविध विषयांवरील दर्जेदार सुमारे ५०० ग्रंथ खरेदी करण्यात आलेले असून या …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत चक्क प्रेमाच्या ओळी अन लाच!

  बेळगाव : राज्यात दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी काम सुरू असताना, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही मूल्यांकन केंद्रांमध्ये विचित्र, मजेशीर आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तर न लिहिता भावनिक अपील, प्रेमाची कबुली, लाच आणि विनंतीने उत्तरपत्रिका भरून टाकल्या आहेत. “सर, मला पास करा, मी तुमच्यावर प्रेम करेन”, किंवा …

Read More »

22 एप्रिलपासून शिंदोळी येथे श्री महालक्ष्मी, श्री दुर्गादेवी, श्री मसणाई यात्रोत्सव….

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील गुरुजन, समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे येत्या मंगळवार दि. 22 ते बुधवार दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे, …

Read More »

कॅन्सरबद्दल जनजागृती करणाऱ्या कॅन्सर योद्धांचा शांताई’तर्फे सत्कार

  बेळगाव : कर्करोगा सारख्या आजारातून मुक्त होऊन मनोबलाच्या जोरावर या गंभीर आजारावर मात करता येऊ शकते, असा समाजाला संदेश देण्याचे काम करणाऱ्या बेळगाव शहरातील कॅन्सर योद्धा अपर्णा खानोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमातर्फे माजी महापौर व आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या पुढाकाराने नुकताच सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमाच्या आवारात …

Read More »

बेळगावात आणखी एका तरुणीची आत्महत्या

  बेळगाव : मुस्लिम तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून बीसीएच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. शिल्पा (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील शिल्पा ही तरुणी बेळगावमध्ये बीसीएचे शिक्षण घेत होती. तिने आपण रहात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिल्पाचे हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील …

Read More »