Sunday , September 20 2026
Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत चक्क प्रेमाच्या ओळी अन लाच!

Spread the love

 

बेळगाव : राज्यात दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी काम सुरू असताना, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही मूल्यांकन केंद्रांमध्ये विचित्र, मजेशीर आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तर न लिहिता भावनिक अपील, प्रेमाची कबुली, लाच आणि विनंतीने उत्तरपत्रिका भरून टाकल्या आहेत.

“सर, मला पास करा, मी तुमच्यावर प्रेम करेन”, किंवा “प्लीज सर, माझं प्रेम तुमच्या हातात आहे”, अशा ओळी काही विद्यार्थ्यांनी लिहिल्या असून, त्यासोबत ५०० रुपयांची नोटही उत्तरपत्रिकेत ठेवण्यात आली आहे. काहींनी “ही चहा पिण्यासाठी सर” अशी टीपही जोडली आहे.

काही उत्तरपत्रिकांमध्ये “प्लीज मॅडम, मला पास करा, नाहीतर आई-वडील मला कॉलेजला पाठवणार नाहीत”, अशी विनंती करण्यात आली आहे. दुसऱ्या एका उत्तरपत्रिकेत “पास केलंत तर अजून पैसे देतो” अशी थेट ऑफरही पाहायला मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *