बेळगाव : 5 मार्च 2025 रोजी बेळगावमध्ये पार पडलेल्या रॉ फिटनेस स्टुडिओ आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी मुंबईहून बेळगावला आलेले इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सभासद व आंतरराष्ट्रीय पंच श्री. आशिष वर्तक यांच्या हस्ते इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले पत्र कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. …
Read More »LOCAL NEWS
मिलटरी महादेव येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी
बेळगाव (प्रतिनिधी) : काँग्रेस रोड येथील मिलिटरी महादेव मंदिरात शेजारी असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आज सोमवारी फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अभिषेक, शिवजन्मोत्सव आणि महाराजांच्या गळ्यात मोत्यांचा कंठ ही माळ, प्रमुख पाहुणे एम. एल. आय. आर. ही. चे ब्रिगेडियर …
Read More »पाच वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना बेळगावच्या गणेशपूर येथे घडली. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गणेशपूर येथील ५ वर्षीय प्राविण्या बोयर गंभीर जखमी झाली. भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करून तिच्या पोटाला, पाठीला आणि पायाचा चावा घेतला. जखमी मुलीला बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »आशा पत्रावळी यांना ‘तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
बेळगाव : बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी लोकरीच्या विणकामातून विविध कलाकृती करून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल नाशिक येथील ग्राहक रक्षक समितीतर्फे त्यांना तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १६६ अनोख्या लोकरीच्या वस्तू तयार केल्याबद्दल त्यांची ‘इन्क्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. आशा पत्रावळी यांनी जपानी विणकाम …
Read More »एस एस क्लासेसतर्फे दहावीसाठी मोफत समर व्हेकेशन
बेळगाव : शाहूनगर येथील एस एस क्लासेस मध्ये नियमित प्रवेश घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समर व्हेकेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन एस एस क्लासेस व्यवस्थापनाने केले आहे. कोरोनापूर्वी सुरू असलेल्या एस एस क्लासेसने पुन्हा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासेसची …
Read More »महाराष्ट्र मंडळातर्फे शब्दाक्षरी स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने मराठी प्रेमींसाठी “शब्दाक्षरी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाण्यांची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारित विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाइन होणार असून अंतिम …
Read More »सौन्दत्तीजवळ झालेल्या कार-लॉरी अपघातात तीन ठार
अंकली : कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौन्दत्ती यल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला असून तुकाराम कोळी (72), रुक्मिणी कोळी (62) आणि सांगली येथील कल्पना अजित कोळी (32) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालकासह आदित्य कोळी (11), …
Read More »बंगळूरात ७५ कोटीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त
राज्यातील सर्वात मोठा ड्रग्जचा पर्दाफाश; दक्षिण अफ्रिकेच्या दोघांना अटक बंगळूर : कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ड्रग्ज विरोधी कारवाईत, शहरात ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. निश्चित माहितीच्या आधारे, मंगळुर सीसीबी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून बंगळुरमध्ये कारवाई हाती घेतली आणि परदेशी नागरिकांना अटक केली. दिल्लीतील …
Read More »तिलारी व जंगमट्टीच्या धरणाचे पाणी मार्कंडेय नदीमध्ये वळविण्यासंदर्भात आम. शिवाजी पाटील यांना निवेदन
बेळगाव : महाराष्ट्र सीमेवरील तिलारी धरणाचे जे कोंकणात वाहून जात असलेले व जंगमट्टीचे शिल्लक असलेले पाणी सीमाभागातील मार्कंडेय नदीमध्ये वळविल्यास महाराष्ट्रातील तुडये, हाजगोळी, सरोळी, डेकोळी, डेकोळीवाडी, सुरुते, शिनोळी खुर्द तथा शिनोळी बुद्रुक तसेच सीमाभागातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, उचगांव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द तथा कंग्राळी …
Read More »येळ्ळूर मराठी मॉडेल स्कूल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीने घेतली शरद पवार यांची भेट
बेळगाव : पुणे येथे भारताचे माजी संरक्षण व कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मराठी मॉडेल स्कूल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीने रविवारी 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता पूणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. दरम्यान 26 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभाला पवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta