बेळगाव : महाराष्ट्र सीमेवरील तिलारी धरणाचे जे कोंकणात वाहून जात असलेले व जंगमट्टीचे शिल्लक असलेले पाणी सीमाभागातील मार्कंडेय नदीमध्ये वळविल्यास महाराष्ट्रातील तुडये, हाजगोळी, सरोळी, डेकोळी, डेकोळीवाडी, सुरुते, शिनोळी खुर्द तथा शिनोळी बुद्रुक तसेच सीमाभागातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, उचगांव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द तथा कंग्राळी बुद्रुक, गर्गोंडवाड, काकती, होनगा, अलतगा, जाफरवाडी, कडोलीसह आदि गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला त्या पाण्याचा लाभ होणार आहे. यापुर्वीही सदर समस्येबाबत वारंवार मागणी करण्यात आली होती. सदर पाणी मार्कंडेय नदीत वळविण्यासाठी आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर मांडून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील हेही उपस्थित होते.