Thursday , December 18 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव – बाची रस्ता दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने पुन्हा बांधकाम खात्याला निवेदन सादर

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला बेळगाव ते बाची दरम्यानचा रस्ता नूतीकरण करावा अशी मागणी करून निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. …

Read More »

बैलहोंगल येथे युवकाची भीषण हत्या!

  बेळगाव : तेरा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि विळ्याचा वापर करून एका युवकाची भीषण हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रवी थिम्मन्नवर (23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलहोंगल येथील शाळेच्या मैदानात 13 जणांनी एकत्र येऊन बिअरची बाटली व …

Read More »

शाहुनगरमध्ये औरंगजेबचे बॅनर; वातावरण तंग

  बेळगाव : बेळगाव येथील शाहुनगरात रविवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी औरंगजेबचे बॅनर लावून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला असून रात्री काही वेळ जनक्षोभ उसळला. बॅनर लावणाऱ्या काही समाजकंटकांच्या कृत्यामुळे सदर हटवण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी हे बॅनर महापालिकेच्या निदर्शनास आणून देताच काही तरुणांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याचा शिरोडा येथे समुद्रात बुडून मृत्यू

  बेळगाव : शिरोडा वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा वेळागर येथील समुद्रात रविवारी सकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक ऊर्फ पप्पू शिंदे (वय 44, रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात …

Read More »

काळादिन सायकल फेरी : समिती नेत्यांसह पत्रकारावरही गुन्हा दाखल

  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिनी मूक सायकल फेरीत सहभागी झालेल्या एकीकरण समिती नेत्यांसह कार्यकर्त्यांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कर्नाटक सरकारने मराठी भाषिक वकील आणि पत्रकारांवर देखील गुन्हे नोंदविले आहेत. ऍड. महेश बिर्जे, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. सुधीर चव्हाण या वकिलांसह सुहास …

Read More »

किमती ऐवजाची बॅग प्रवाशाला परत; रिक्षा चालकाचा सत्कार

  बेळगांव : दिवाळीसाठी बेळगावात आलेल्या परगावच्या नागरिकाची किमती ऐवजाची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षा चालकाचा सत्कार करण्यात आला. राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मिस्त्री दुबईवाले तसेच रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने ही बॅग परत मिळाली त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बेळगावात आलेले महेश जगजंपी यांना त्यांची बॅग रिक्षामध्ये …

Read More »

बिदर येथे काळादिन गांभीर्याने पाळून, निषेध फेरी

  बिदर : सीमाभागात 1 नोव्हेंबर हा काळा दिन व सुतक दिवस म्हणून पाळण्यात येतो. बोन्थी तालुका औराद बिदर येथे समितीचे अध्यक्ष रामराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवला. यावेळी बोलताना रामराम राठोड म्हणाले की, गेली 69 वर्ष सीमाभागातील मराठी …

Read More »

अरगन तलावात आढळला आई-मुलाचा मृतदेह!

  बेळगाव :  हिंडलगा रोडवरील गणपती मंदिर परिसरातील अरगन तलावात आज शनिवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. तलावात स्वतःला झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कॅम्प येथील विनायक मंदिरा शेजारील अरगन तलावात दोन मृतदेह तरंगत असल्याचे मिलिटरी प्रशासनाना लक्षात आले. लागलीच याची …

Read More »

१ नोव्हेंबर काळ्या दिनी सीमाबांधवांचा एल्गार!

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात आली. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी …

Read More »

सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरी काढली. या फेरीत सहभागी झालेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे व्यक्तव्य सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीवर …

Read More »