बेळगाव : हिंदी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध आहे. आजच्या सोशल मीडियामुळे हिंदी भाषेची लोकप्रियता वाढत आहे. हिंदी भाषेला काका कालेलकर, सेठ गोविंददास आणि हजारी प्रसाद द्विवेदी यांनी गौरव प्राप्त करुन दिला आहे. हिंदी भाषा युनोस्कोने सुद्धा महत्व दिलेले आहे, असे प्रतिपादन नई दिल्ली येथील …
Read More »LOCAL NEWS
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात लोकायुक्तमध्ये एफआयआर दाखल
बेंगळुरू : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर लोकायुक्तात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्त एडीजीपी मनीष करबीकर यांच्या सूचनेनुसार म्हैसूर लोकायुक्त एसपी उदेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एफआयआरमध्ये ए 1, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती ए 2, पार्वती यांचा …
Read More »राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे राणी पार्वती देवी महाविद्यालयात स्थलांतर
एम ए मराठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बेळगाव : इसवी सन 2010 साली स्थापन झालेले बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ हे कर्नाटकातील नामांकित विद्यापीठांपैकी एक आहे. 351 संलग्न महाविद्यालये, 21 पदव्युत्तर विभाग, एक घटक महाविद्यालय, चार स्वायत्त महाविद्यालये, डिप्लोमा कार्यक्रम, सर्टिफिकेट कोर्स, पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन, राणी चन्नम्मा अध्यासन, …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.
Read More »बेळगाव महापालिकेला आणखी एक धक्का; मूळ मालकाला जमीन परत
खंजर गल्ली – जलगार गल्लीतील खाजगी जमिनीवर रस्ता बांधकामाचे प्रकरण बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या हद्दीत खासगी जमिनीवर बांधलेला रस्ता मोकळा करून मूळ मालकाला परत केल्याची आणखी एक घटना घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वी बेळगावमधील खंजर गल्ली-जालगार गल्ली येथे मकबूल आगा यांच्या मालकीच्या ८०० चौरस फूट जागेवर रस्ता तयार करण्यात …
Read More »राज्य सरकारने सीबीआयच्या खुल्या चौकशीची परवानगी घेतली मागे
आता राज्यात प्रवेशासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील मुडा भूखंड घोटाळा, वाल्मिकी महामंडळ निधीचा गैरवापर अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या राज्य सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या हातातून सुटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या हद्दीत तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिलेली खुली परवानगी राज्य सरकारने …
Read More »मंत्रिमंडळातील सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी
मंत्री, कायदेतज्ञांशी सविस्तर चर्चा; उच्च न्यायालयात आव्हान देणार बंगळूर : मुडा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची योजना आखत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कायदेतज्ज्ञ आणि काही मंत्र्यांशी पुढील कायदेशीर निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्र्याच्या पाठिश खंबीर रहाण्याचा निर्धार केला असून, कायदेतज्ञांच्या सल्यानुसार …
Read More »एनपीएस रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
बेळगाव : राज्य काँग्रेस सरकारने जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे ओपीएसची अंमलबजावणी करावी, अशी मागणी एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे जिल्हाध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी केली. एनपीएस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची आणि राजस्थान मॉडेलवर जुनी पेन्शन प्रणाली सुरू ठेवण्याची विनंती केली. एनपीएस योजनेमुळे …
Read More »अथणी येथील एका तरुणावर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला
अथणी : कांही दिवसांपूर्वी अथणी तालुक्यातील काकमरी गावात जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती अथणी शहरातील शशिकांत लक्ष्मण आक्केण्णावर या तरुणाला मिळाली. त्यानुसार सदर तरुण जमीन पाहण्यासाठी गेला असता तेथील एका महिलेसह ६ अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणाच्या मांडीवर लाथ मारण्यात आली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. …
Read More »मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून महिलेला विहिरीत ढकलले
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील मसणाई देवस्थानाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या देवस्थानातील चांदीचे दागिने चोरीला गेले असून मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. भारती पुजारी (रा. शिंदोळी, वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta