एम ए मराठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे
बेळगाव : इसवी सन 2010 साली स्थापन झालेले बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ हे कर्नाटकातील नामांकित विद्यापीठांपैकी एक आहे. 351 संलग्न महाविद्यालये, 21 पदव्युत्तर विभाग, एक घटक महाविद्यालय, चार स्वायत्त महाविद्यालये, डिप्लोमा कार्यक्रम, सर्टिफिकेट कोर्स, पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन, राणी चन्नम्मा अध्यासन, संगोळी रायण्णा अध्यासन, या सर्वांच्या माध्यमातून गेली 14 वर्षे येथे अध्ययन, अध्यापन संशोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. दरवर्षी सुमारे 5000 विद्यार्थी येथून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करतात. जवळजवळ 400 संशोधन विद्यार्थी पीएच. डी. करीत आहेत. तर 90 विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वर्षभर विविध विषयावरील कार्यशाळा, चर्चासत्रे, विशेष व्याख्याने, इत्यादीच्या माध्यमातून सततचे ज्ञानसत्र येथे सुरू असते.विद्यार्थ्यांना ज्ञानमुखी, उद्योगमुखी, कौशल्यमुखी, अभ्यासक्रम देणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. पुणे-बेंगलोर महामार्गाला लागून बेळगाव शहरापासून 18 किलोमीटर वर असलेल्या निसर्गरम्य परिसरात 178 एकरात विद्यासंगम नावाने स्थित असलेले राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मुख्य कॅम्पस, तसेच विजापूर येथील कॅम्पस उत्तर कर्नाटकातील उच्च शिक्षणाची गरज भागवीत आहे. हिरेबागेवाडी येथे नवीन कॅम्पसची उभारणी होत आहे. विद्यासंगमा बरोबरच हिरे बागेवाडी येथे विज्ञानसंगम नावाचे नवे सुसज्ज इमारतींचे कॅम्पस तयार झाले आहे.
या विद्यापीठाचा मराठी विभाग हा आपल्या नवनवीन उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असतो. विभागाने आपल्या अभ्यासक्रमांमध्ये पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर नवीन युगासाठी गरजेचे असलेले रोजगारक्षम पेपर अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेले आहेत. कार्यालयीन मराठी, विविध माध्यमांसाठी लेखन कौशल्य, भाषण, मुलाखत, संभाषण कौशल्य, सभाधीटपाण, सूत्रसंचालन, जाहिरात लेखन, श्रूज जनशील लेखन, भाषेतून व्यक्तिमत्व विकास, अनुवाद कौशल्य इत्यादी रोजगारक्षम तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित असे पेपर अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. सर्वतोपरी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व मराठी भाषा-संस्कृती संवर्धनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम बनवला आहे. विभागात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही चालते गडहिंग्लज येथील श्रुती करियर अकॅडमी या स्पर्धा परीक्षा केंद्राशी विभागाने सामंजस्य करार केला आहे. त्या अंतर्गत वारंवार स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते याचा फायदा घेऊन अनेक विद्यार्थी नेट, सेट, परीक्षा पास झाले आहेत शिवाय आमच्या विभागात एक सीनियर रिसर्च फेलो ज्याला महिन्याला 49000 स्कॉलरशिप मिळते व एक जूनियर रिसर्च फेलो ज्याला महिन्याला 35000 स्कॉलरशिप मिळते व एक एनएफएस विद्यार्थी आहे जिला महिन्याला 36000 स्कॉलरशिप मिळते. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाशीही या विभागाचा सामंजस्य करार आहे. विभागात तीस विद्यार्थी पीएच.डी.चे अध्ययन करीत आहेत त्यापैकी अनेकांचे उत्तम संशोधन पत्रिकामध्ये संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत अनेकांची संशोधन पर पुस्तके तसेच स्वतंत्र पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत अनेक विद्यार्थी विविध पुरस्कारांचे मानकरी आहेत. आगामी काळात मराठी विभाग वेणुध्वनी 90.4 व गोवा विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्याशी सामंजस्य करार करणार जेणेकरून विद्यार्थ्यांना वेणुध्वनी 90.4 वर आपले कार्यक्रम सादर करता येतील व गोवा विद्यापीठाच्या विभागासोबत विद्यार्थीहिताच्या दृष्टिकोनातून अनेक संयुक्त उपक्रम घेता येतील विभागातील सर्व प्राध्यापक उच्च विद्या विभूषित आहेत अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत त्यांची अनेक पुस्तके व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित आहेत. येथे येणारे विद्यार्थी हे अगदी खानापूर पर्यंतच्या खेड्यापाड्यातून येतात त्यांना विद्यासंगम कॅम्पस खूप दूर होत असल्यामुळे इच्छा असूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही विभागाचा लाभ घेता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच शहरातील संलग्न महाविद्यालयातील मराठी विभागांशी जोडलेले राहून कार्य करता यावे या हेतूने हा मराठी विभाग राणी चन्नम्मा विद्यापीठाचे स्वायत्त महाविद्यालय असलेले एस.के. सोसायटीचे राणी पार्वती देवी महाविद्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला आहे. एस के सोसायटीनेही आनंदाने याचा स्वीकार केला आहे. विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेण्यासाठी https//uucms.karnatak.gov.in या लिंक वर जाऊन ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करता येईल एम. ए.ला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही पदवीचा (बीए बीकॉम बीएससी बीबीए बीसीए) विद्यार्थी चाळीस टक्के घेऊन उत्तीर्ण झालेला असेल तर तो प्रवेश घेण्यास पात्र आहे. सायबर सेंटर मध्ये फॉर्म भरल्यास सोपे जाईल. फॉर्म भरताना दहावी-बारावी डिग्रीचे सहा सेमिस्टरचे मार्कलिस्ट, आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, सध्याच्या तारखेचे कास्ट-इन्कम सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे दोन फोटो या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर हार्ड कॉपी मराठी विभागाला जमा करायची आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास राघवेंद्र दंडगल 8867224252 यांच्याशी संपर्क साधावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विभागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने अगदी माफक फी आकारण्याचे ठरवले आहे. प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास वरील नंबर वर फोन केल्यास तुम्हाला त्या प्रक्रियेचा व्हिडिओ पाठवला जाईल प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 8-10-24 ही आहे. 220 रुपये भरून अर्ज करायचा आहे.