Friday , August 28 2026
Breaking News

बेळगावमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुदगुंटी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शहरातील ५८ वॉर्डांपैकी १० वॉर्डांमध्ये सध्या २४ तास पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित भागात पाणीटंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, बेळगाव शहराला राकसकोप, हिडकल आणि बसवणकोळ या स्रोतांमधून दररोज एकूण १०५ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या ४८ वॉर्डांमध्ये ४ ते ५ दिवसांआड पाणी दिले जात असून, जून महिन्यापर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील ८४० बोअरवेल्ससोबतच अतिरिक्त ३० खासगी बोअरवेल्स आणि १० खुल्या विहिरींची ओळख पटवण्यात आली आहे. गरज भासल्यास या विहिरी आणि बोअरवेल्स भाड्याने घेतल्या जातील. तसेच ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, तिथे पाणी पोहोचवण्यासाठी महापालिकेचे २८ टँकर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती अशोक दुडगुंटी यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावचे सीईओ राहुल शिंदे यांच्यावर सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी

Spread the love  बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *