Friday , August 28 2026
Breaking News

बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : ‘मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहळ्ळी बेळगाव शाळेतील 55 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला.
देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच गरज आहे. याच उद्देशाने शाळेने या दैदिप्यमान अशा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.आधार सोशल ट्रस्ट, धायरी (पुणे) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील अथर्व बेळगुंदकर या नववीतील विद्यार्थ्याचा सोळा हजार शुभेच्छा पत्रातून तृतीय क्रमांक आला. शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांनी प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामध्ये शाल, प्रशस्तीपत्र, कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश होता. या यशाबद्दल, शिक्षक संचालिका अर्चना गोरले, मुख्याध्यापिका मनिषा महाजन, व्यवस्थापक सायमा जॉन, संयोजक सलमान पठाण, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षक यांनी अभिनंदन केले. शाळेच्यावतीने हा उपक्रम मुख्याध्यापिका मनिषा महाजन आणि शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यात शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

“आधार सोशल ट्रस्टने फक्त कार्यक्रम नाही केला तर एक संस्कार घडवला आहे.”
हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे जवानांसाठी ग्रीटिंग कार्ड्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसंस्कार रुजवणारा, सैनिक व विद्यार्थी, शिक्षक पालक, संस्था यांना जोडणारा सेतू, देशभक्तीची ज्योत पेटवणारा, प्रेरणादायी सोहळाच होता. कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांच्यामुळे ज्ञान, संस्कार आणि साहित्यिक उंची लाभली असे आदरणीय एकनाथ आव्हाड यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते. या संस्थेचे संस्थापक ज्यांच्या या महान कार्यामागे ध्यास, स्वप्न व सामाजिक बांधिलकीतून हा महान कार्य उभा राहिला असे संतोष चाकणकर प्रेरणास्थान आहेत. बीएसएफचे जवान जे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे असे तसेच ज्यांच्या उपस्थितीने आपल्या मनात देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली. राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धक, समन्वयक या सर्वांना एकत्र ठेवून भव्य कार्यक्रम उभा करण्यात आला. सर्वांनी दिलेली शुभेच्छा कार्ड्स सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावचे सीईओ राहुल शिंदे यांच्यावर सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी

Spread the love  बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *