Thursday , June 18 2026
Breaking News

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला प्राधान्य द्यावे; अरुण निकाडे

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सन्मान

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा आभाव असतो पण त्यावर मात करीत करिअर निवडतांना स्पर्धा परीक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे मत स्कूल बेटरमेंट कमिट अध्यक्ष अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एस. ए. पाटील यांनी विद्यालयाच्या दहावी परीक्षा निकाल विश्लेषणाचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते कुर्ली परिसरातील सातवी, दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या ४० विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या काळात पारंपरिक ज्ञानाची व नोकरीची क्षेत्र पुरेसी पडणारी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नवनव्या ज्ञान क्षेत्रांचा शोध घेऊन प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात असे सांगितले. पालक संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कष्टाचा सन्मान करणारा प्रेरणादायी उत्सव असल्याचे सांगून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनिल माळी, नामदेव निकाडे, शिवाजी चौगुले, मनोज निकाडे, नाना पाटील, अप्पासाहेब लोकरे, सीताराम चौगुले, टी. पी. कांबळे, एस डी वडराळे, अमित खोत, राजाराम पाटील, सर्जेराव गाडीवडर, तानाजी शेटके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर एस. एस. साळवी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू : संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती

Spread the love  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *