Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेतून येळ्ळूर येथील श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले यांना घर मंजूर

  बेळगाव : येळ्ळूर कार्यक्षेत्रामध्ये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेकडून श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले लक्ष्मी गल्ली येळ्ळूर यांना वात्सल्य घर मंजूर झाले आहे. त्यासाठी 10,15000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्या जागेचे भूमिपूजन सोमवार दिनांक 19/08/2026 रोजी सकाळी 11-00 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दुदाप्पा बागेवाडी हे होते. …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून मुलीच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

  बेळगाव : प्रत्येक वर्षी लक्ष्मीकांत कांबळे हे आपली कन्या कृतिका लक्ष्मीकांत कांबळे हिच्या वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी अन्नदान करत असतात. पण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडे गरजू विद्यार्थ्यांच्या करिता आर्थिक मदत पोहोचविली. फाउंडेशनच्या संस्थापिका माधुरी जाधव यांनी ही मदत श्रीधर केसरकर आणि …

Read More »

कर्ले गावात भर रस्त्यात एकाचा निर्घृण खून

  बेळगाव :  कर्ले गावात एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तलवार वय 55 असे आहे. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्लेच्या …

Read More »

राज्यपालांच्या विरोधात बेळगाव जिल्हा काँग्रेसचे तीव्र आंदोलन

  बेळगाव : म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात खळबळ माजवली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडले. यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

इस्कॉनमध्ये बलराम जयंती साजरी

  बेळगाव : ‘भगवान श्रीकृष्ण हे आपले बंधू बलराम यांच्या सोबतच पृथ्वीवर प्रकट होतात असे वर्णन श्रीमद् भागवत या ग्रंथातील दहाव्या अध्यायात करण्यात आले आहे’ अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या व्याख्यानात दिली. बलराम जयंतीच्या निमित्ताने सोमवारपासून महाराजांचे कथाकथनास प्रारंभ झाला. इस्कॉनच्या श्री …

Read More »

रामदेव गल्ली वडगाव येथे 3 मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्रम

  बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी यांची प्रतिष्ठापना व नव्या मंदिराची वास्तुशांती, विधिवत हवन वगैरे कार्यक्रम बुधवार दि. 21 ऑगस्ट ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. अनेक देणगीदारांच्या देणगीतून या परिसराचा कायापालट करण्यात आला असून तेथे …

Read More »

मराठा लाईट इन्फ्रन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रक्षा बंधन साजरा

  बेळगाव : बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारा रक्षाबंधन सण मराठा लाईट इन्फ्रन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने पार पडला. यामध्ये सेंटर मधील अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते. विविध सामाजिक संस्थांच्या महिला आणि शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेत असलेले अग्निविर, जवान तसेच अधिकारी यांना राखी बांधली. आपले घर …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कविवर्य द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक अलगोंडी यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

आदर्श को-ऑप. सोसायटीत ई स्टँप सेवेचा प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श को-ऑप. सोसायटीमध्ये नागरिकांच्या सोईसाठी ई-स्टँप सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव यांच्या हस्ते ई स्टँप सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श सोसायटी नागरिकांच्या हितासाठी कार्यरत असून नागरिकांनी या नव्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन जाधव यांनी यावेळी …

Read More »

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना

  बेळगाव : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीची स्थापना करण्यात आली. या आशयाचे पत्र सहकार खात्याकडून दिनांक 30-1 -2024 रोजी Reg No.DRL/RSR/UOG/55826/2023-24 यानुसार प्राप्त झाले. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या संदर्भात संस्थेच्या कार्यालयात श्री. वाय. एन. मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून …

Read More »