Monday , September 21 2026
Breaking News

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेतून येळ्ळूर येथील श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले यांना घर मंजूर

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर कार्यक्षेत्रामध्ये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेकडून श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले लक्ष्मी गल्ली येळ्ळूर यांना वात्सल्य घर मंजूर झाले आहे. त्यासाठी 10,15000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्या जागेचे भूमिपूजन सोमवार दिनांक 19/08/2026 रोजी सकाळी 11-00 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दुदाप्पा बागेवाडी हे होते. शिल्पा मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले. बेळगांव जिल्हा निर्देशक श्री. सतीश नाईक, योजना अधिकारी ज्योती जोल्लद, बेळगांव जिल्हा जनजागृती सदस्य दुदाप्पा बागेवाडी, सहदेव सर, ग्रामपंचायत सदस्य जोतिबा चौगुले, लक्ष्मी येळ्ळूरकर आणि नवजीवन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी बोलताना सतीश नाईक म्हणाले, श्री मंजुनाथ स्वामी व श्री चांगळेश्वरी देवीच्या कृपॆने या कुटूंबाला राहण्यासाठी घर मंजूर केले आहे. हे घर लवकरात लवकर तयार होउदे आशी देवापाशी प्रार्थना केली.
त्यानंतर दुदापा बागेवाडी यांनी डॉ. विरेंद्र हेगडे व माई हेमावती हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येळ्ळूर गावामध्ये महिलांसाठी अनेक योजना आणल्या व मंदीर आणि शाळेसाठी अर्थसहाय्य केले. गोरगरीबाना वेगवेगळी मदत करत असताना गावामध्ये दोनवेळा व्यसन शिबीर भरवुन युवकांना व्यसनापासून मुक्त केले, त्यानंतर योजनाधिकारी ज्योती जोल्लद यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *