Sunday , September 20 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कविवर्य द. रा. किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक अलगोंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे सदस्य विजय बोंगळे, नीला आपटे, इंद्रजीत मोरे उपस्थित होते. इयत्ता आठवी व दहावीसाठी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये 170 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावीच्या एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इतक्या मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी विद्यार्थ्यांचे व सातत्याने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केल्याबद्दल साठे प्रबोधिनीचे अभिनंदन केले. विजय बोंगाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बालसाहित्य संमेलनामध्ये बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन सावंत, धीरजसिंह राजपूत, दत्ता पाटील, शशिकांत धामणेकर, बाळकृष्ण मनवाडकर, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रसाद सावंत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *